आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, तर्फे संस्थेचे माजी अध्यक्ष मा. श्री. बबनराव आप्पासाहेब बिरनाळे यांचा ८० वा वाढदिवस (अमृत महोत्सव) 2 मार्चला अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री वसंतराव बंडूजी पाटील ट्रस्टचे आधारस्तंभ आणि माजी अध्यक्ष मा. श्री. बबनराव आप्पासाहेब बिरनाळे यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केल्याबद्दल, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाविद्यालयात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे उप प्राचार्या डॉ डी.एस. बिरनाळे, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संस्थेच्या प्रगतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तद्नंतर माजी अध्यक्ष मा. श्री. बबनराव आप्पासाहेब बिरनाळे यांनी
“शिक्षण संस्था ही केवळ इमारत नसून ती भविष्यातील पिढी घडवणारे मंदिर आहे. शिस्त आणि प्रामाणिकपणा हेच माझ्या आयुष्यातील यशाचे गमक आहे.”असे मार्गदर्शन केले.
शेवटी सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित सर्वांनी त्यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना केली. महाविद्यालयाच्या वतीने सहा.प्राध्यापक किर्तीकर सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

