Skip to content
logo final

SHRI VASANTRAO BANDUJI PATIL TRUST’S

APPASAHEB BIRNALE COLLEGE OF EDUCATION, SANGLI

B.Ed & M.Ed

Shinde Mala, Near Railway Station, Sangli (M.S.) 416 416 (0233) 2313333 Fax 2313366

Approved by NCTE New Delhi and Govt. of Maharashtra, Affiliated to Shivaji University Kolhapur, Accredited by NAAC with “B” Grade and 2.14 CGPA till 2029

NAAC-02-1

NCTE Code No: B.Ed APW06146 / 123759

NCTE Code No : M.Ed APW07910 / 125233 / 123759

आप्पासाहेब बिरनाळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बी.एड. प्रशिक्षणार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

अप्पासाहेब बिरनाळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बी.एड. (बॅच २०२४-२०२६) च्या प्रशिक्षणार्थ्यांचा सदिच्छा समारंभ गुरुवारी, दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. निरोप आणि नवीन वाटचालीच्या शुभेच्छा देणाऱ्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये भावूक वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उप-प्राचार्या डॉ. डी. एस. बिरनाळे मॅडम लाभल्या होत्या. पर्यावरणाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आणि संवर्धनाचा संदेश देत, मान्यवरांच्या हस्ते रोपट्यांना पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली
या सदिच्छा समारंभाचे संपूर्ण नियोजन बी.एड. द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी अत्यंत नेटकेपणाने केले होते. महाविद्यालयातील दोन वर्षांचा प्रवास, मिळालेले शिक्षण आणि शिक्षकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला भेटवस्तू प्रदान केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी सहा. प्राध्यापक आर. बी. माने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भावी शिक्षक म्हणून समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. डी. एस. बिरनाळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षक बनण्यासाठी सातत्याने ज्ञानार्जन करण्याचे आवाहन केले. तसेच संस्थेचे चेअरमन समीर बिरनाळे सर आणि संस्थेचे डायरेक्टर सागर बिरनाळे सर यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या पाठिंब्यामुळेच सदरचे कार्यक्रम यशस्वी होत आहेत.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवट स्नेहभोजनाने करण्यात आला.