आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.यावेळी उप- प्राचार्य डॉ.डी.एस. बिरनाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोस आदरांजली वाहिली. तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूणच शैक्षणिक कार्याची उजळणी केली. त्यांचे सामाजिक शैक्षणिक कार्य समाजासाठी प्रेरक कसे ठरले हे सांगितले.
त्यांनतर प्रमुख उपस्थिती सहा.प्रा.चांदणे एस.व्ही.यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक अंगाना स्पर्श करून आपल्या देशाला त्यांच्या विचारांची का गरज आहे हे पटवून सांगितले.यावेळी बी. एड. एम.एड. मधील सर्व प्रशिक्षणार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.



