सांगली येथील श्री वसंत बंडूजी पाटील ट्रस्ट संचलित, आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशनमधील एम.एड. विभागाचा (बॅच २०२४-२६) निरोप समारंभ आज दि. २३ एप्रिल २०२६ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. निरोपाचा क्षण असला तरी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर भविष्यातील यशाची उमेद आणि कॉलेजच्या आठवणींचा ओलावा पाहायला मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर विद्यार्थिनींनी सुश्राव्य स्वागत गीत सादर करून उपस्थित पाहुण्यांचे आणि शिक्षकांचे स्वागत केले. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांतील शैक्षणिक अनुभव, प्राध्यापकांचे लाभलेले मार्गदर्शन आणि मैत्रीचे बंध यावर बोलताना अनेक विद्यार्थी भावूक झाले.
यानंतर शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले वर्गशिक्षिका सहा. प्रा. माने एस. जी. मॅडम आणि इतर मार्गदर्शक प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना भविष्यात यशस्वी संशोधक आणि आदर्श प्राध्यापक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ‘प्रवास संपला तरी नात्यातील ओलावा कायम ठेवावा,’ असा मोलाचा संदेश यावेळी देण्यात आला.
महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. दीपा बिरनाळे मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना बदलत्या शैक्षणिक प्रवाहात स्वतःला अपडेट ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला सहा. प्रा. होनमाने पी. पी. मॅडम, सहा. प्रा. पाटोळे व्ही. एन. मॅडम आणि सहा. प्रा. चांदणे एस. व्ही. सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सहभभोजनांनंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच संस्थेचे चेअरमन समीर बिरनाळे सर आणि संस्थेचे डायरेक्टर सागर बिरनाळे सर यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या पाठिंब्यामुळेच सदरचे कार्यक्रम यशस्वी होत आहेत.




