editor
Posts by :
“आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली. येथे वृक्षारोपण उत्साहात संपन्न”
सोमवार दि.05/08/2024 आप्पासाहेब बिरनाळे jकॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली. येथे वृक्षारोपण उत्साहात संपन्न झाले. सदरचे वृक्षारोपण करताना शिवाजी विद्यापीठ एम एड सेम III आंतरवासीता 2 नुसार या कार्यक्रमांची अंमलबजावणी विभागप्रमुख प्रा. होनमाने. पी .पी .यांनी एम एड प्रशिक्षणार्थिना योग्य सूचना देऊन बी एड प्रशिक्षणार्थिकडून वृक्षारोपण कार्यक्रमाची तयारी करून घेतली. यावेळी विविध प्रकारच्या रोपांची लागवड विद्यार्थी वसतिगृह परिसरात करण्यात आली. ही सर्व रोपे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, इतर कर्मचारी व बी.एड. व एम.एड. प्रशिक्षणार्थी यांचे हस्ते लावण्यात आली. विविध प्रकारच्या रोपांची लागवड कशी करावी? यासंदर्भात प्रथमता सहा.प्रा.माने आर. बी. यांनी माहिती सांगितली. त्यानंतर प्रत्यक्ष वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. तसेच सदर रोपांचे संवर्धन करण्याची जबाबदारी बी.एड व एम.एड. च्या प्रशिक्षणार्थिनी घेतली. असे नावीन्यपूर्ण उपक्रम सतत आपल्या महाविद्यालयात घेतले जातात. तसेच अशा उपक्रमाने आपले महाविद्यालय ” ग्रीन कॅम्पस ” होण्यासाठी आणखी भर पडणार आहे. या अशा उपक्रमास संस्था चेअरमन श्री. समीर बिरनाळे, संस्था डायरेकटर श्री. सागर बिरनाळे यांचा पाठिंबा असतो.
जागतिक ग्रंथपाल दिन” नवोपक्रमाने साजरा
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली. मध्ये “जागतिक ग्रंथपाल दिन” नवोपक्रमाने साजरा
सोमवार दि. 12/08/2024 आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये “राष्ट्रीय ग्रंथपाल दिन” उत्साहात संपन्न झाला. सुरवातीस सहा. प्रा. माने एस जी यांचे हस्ते दिपप्रज्वलन व एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात झाली.. यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप ग्रंथपाल वाघ तृप्ती यांनी स्पष्ट केले. तसेच ग्रंथालयाचे महत्व सांगितले त्याचप्रमाणे पुढे त्या म्हणाल्या, भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त (12 ऑगस्ट) राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृध्दींगत व्हावी यासाठी ग्रंथालयाचे असलेले महत्व आणि डॉ. रंगनाथन यांचे कार्य याविषयी माहिती सांगितली. ग्रंथालयशास्त्राचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय ग्रंथपाल
दिन साजरा केला जातो. ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था असून समाजाच्या हितासाठी ग्रंथालयाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. ग्रंथालयाचे जतन करणारा ग्रंथपालही महत्वाचा घटक आहे. ज्याप्रमाणे वाचकांच्या गरजा वाढतात, बदलतात त्याचप्रमाणे ग्रंथपालनाच्या कक्षाही वाढत जाणे आवश्यक आहे. भारतीय ग्रंथालयात साधारणतः 1965 नंतर संगणकाने प्रवेश केला. सर्वप्रथम Indian National Sicentific Documentation Center (INSDOC) मुंबई, Bharat Automic Reserach Center (BARC), BHEL आदी ठिकाणी ग्रंथालयात संगणकाचा वापर झाला. नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी जागेच्या प्रश्नाला पर्याय दिला खरा पण यामुळे ग्रंथालये नष्ट तर होणार नाहीत ना, अशी भीतीही व्यक्त होऊ लागली. मात्र, जुने सोडायचे नाही पण नवेही स्वीकारायचे, या धोरणावर ग्रंथपाल संगणकाचे ज्ञान अवगत करू लागला. ई-रिसोर्सेसमध्ये ई-बुक, ई-जर्नल्स, सीडी, डीव्हीडी, मायक्रोचिप, मायक्रोफॉर्म, कार्ड रिडर आदींचा समावेश होतो. तर पारंपरिक साधनांमध्ये लिखिते, हस्तलिखिते, ग्रंथ, नियतकालिके, नकाशे, गॅजेट्स आदींचा समावेश होतो. पुस्तकांच्या विश्वात काम करणारा ग्रंथपाल (लायब्ररियन) हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. या दोन्हीचा समन्यय राखण्यासाठी ग्रंथपालाला नेहमी प्रयत्नशील राहावे लागते. 12 ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो, ग्रंथालय विज्ञानाचे राष्ट्रीय प्राध्यापक, डॉ एसआर रंगनाथन (1892-1972), ज्यांनी भारतात ग्रंथालय विकासाचे नेतृत्व केले होते .
या दिवशी लोक एकत्र येऊन आपल्या समाजात ग्रंथालये आणि
ग्रंथपाल यांची महत्त्वाची भूमिका साजरी करतात. वाचन आणि पुस्तके प्रत्येकासाठी सुलभ आणि परवडणारी बनविण्याचे महत्त्व प्रतिबिंबित करण्याचा हा दिवस आहे ग्रंथालय आणि माहिती विज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या श्री. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा केला असेही त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एड. प्रशिक्षणार्थी कामिल नदाफ तर आभार बी एड प्रशिक्षणार्थी भरत खवाटे यांनी मानले यावेळी प्राचार्य डॉ पी. के. पाटील, सहा.प्रा.डॉ. दिपा बिरनाळे, यावेळी बहुसंख्य बी.एड.एम.एड. चे प्रशिक्षणार्थी तसेच एम.एड.चे सहयोगी प्रा.डॉ. इनामदार आर. आय., सहा. प्राध्यापक चांदणे. एस.व्ही., प्रा.पाटोळे व्हीं. एन. प्रा.होनमाने पी.पी., प्रा.माने एस. जी., प्रा.श्री. राहुल पाटील बी.एड.चे सहा.प्रा.माळी एस.के., श्री. किर्तीकर वाय. एस., प्रा.श्री. रमेश माने, प्रा. कदम व्ही.व्ही., श्री. समीर मुजावर, श्री. कौतुक काटकर इतर कर्मचारी, अमोल सकळे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास संस्था चेअरमन मा. श्री. समीर बिरनाळे सर, डायरेक्टर श्री. सागर बिरनाळे सर यांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य होते.
बालभारती” शैक्षणिक भेट
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मधील एम.एड. विभागाची
” “बालभारती” शैक्षणिक भेट संपन्न ” सांगली. मंगळवार दि.27/08/2024.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर एम.एड. अभ्यासक्रम व शिक्षक शिक्षण आंतरवासीता अंतर्गत आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथील एम.एड. विभागाची “बालभारती” कार्यालय, तसेच पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र, कोल्हापूर येथे आज भेट दिली. यावेळी संपूर्ण बालभारती परिसर, तेथील स्वच्छता प्रत्येक विभागाची सातत्याने चाललेली कामे, तेथील कर्मचारी यांच्यातील आपुलकीचे नाते हे पाहून आम्ही खूप भारावून गेलो. सुरुवातीस श्री. सचिन जाधव यांनी पाठ्यपुस्तक निर्मिती पूर्व कागद, त्याचा दर्जा, त्यासाठी दिली जाणारी टेंडर प्रक्रिया हे सर्व अतिशय योग्य क्रमाने माहिती दिली.एम.एड. प्रशिक्षणार्थीनी अतिशय शांतपणे ही सर्व माहिती ऐकून सर्व माहिती नमूद करून घेतली. त्यानंतर बालभारती कार्यालय इमारतीची रचना, एकूण चार मजली इमारत, प्रत्येक विभागाची पाहणी करून पुस्तकांचे वितरण करताना स्वतंत्र विभाग कसे केले आहेत. यासंबंधी श्री. सचिन जाधव यांनी सुरेख मार्गदर्शन केले. चारही मजले, तेथील पुस्तक व्यवस्थापन करणे, किती क्लिष्ट गोष्ट आहे. हे या वेळेस समजले. येथील कर्मचारी अतिशय शांतपणे व सराईतपणे काम करताना दिसत होते. हे सर्व पाहत असताना सर्व एम.एड. प्रशिक्षणार्थीनी, तसेच सहा. प्राध्यापक यांनी प्रत्येकाला हवी असणारी पुस्तके खरेदी करण्याचा मोह आवरता आला नाही. यानंतर सर्वांनी बालभारती कार्यालय भांडार व्यवस्थापक श्री. किशोर पाटील यांनी दिलेल्या चहाचा आस्वाद घेत त्यांचे
कामाचा अनुभव आम्हा सर्व प्राध्यापकांनी त्यांच्याकडूनच ऐकला. त्यानंतर कार्यालय आवारात एक छोटासा कार्यक्रम घेतला गेला यामध्ये सुरुवातीस प्रा. प्राजक्ता होनमाने यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये या भेटी मागील उद्देश स्पष्ट केला. व भांडार व्यवस्थापक श्री किशोर पाटील यांनी भेटीच्या परवानगी पासून आत्तापर्यंत दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.
त्यानंतर बालभारती कार्यालय प्रमुख व भांडार व्यवस्थापक श्री. किशोर पाटील यांनी बालभारती स्थापने मागील उद्दिष्टे, पुस्तकांची संख्या, वितरण व्यवस्था याविषयी संपूर्ण मार्गदर्शन केले. व आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मध्ये होत असणारे भविष्यातील शैक्षणिक उपक्रम यासाठी बालभारती कार्यालय सदैव खुले राहील. अशी ग्वाही दिली. त्यानंतर प्रा. सतीश चांदणे यांनी या भेटी मुळे आमच्या प्रशिक्षणार्थी ना काम करण्याची नवी प्रेरणा व ऊर्जा मिळाल्याचे आवर्जून सांगितले शेवटी एम.एड. प्रशिक्षणार्थी प्रियांका पाटील यांनी आभार मानले. व कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी एम.एड.चे सहयोगी प्रा. इनामदार आर. आय., सहा.प्रा. पाटोळे व्ही. एन. सहा.प्रा.माने एस.जी. ग्रंथपाल वाघ टी. ए. उपस्थित होते. सदरच्या शैक्षणिक भेटी मागे संस्थापक अध्यक्ष श्री. बबनराव बिरनाळे चेअरमन श्री. समीर बिरनाळे सर डायरेक्टर श्री. सागर बिरनाळे सर, प्राचार्य डॉ. पी. के. पाटील सर, डॉ. दिपा बिरनाळे यांची प्रेरणा मिळाली.
शिक्षक दिन-
शिक्षक दिन-“शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असतो” सहा. प्रा. सविता माळी- जाधव गुरुवार दि.05/09/2024 आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली. येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमात सुरुवातीस कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.पी. के. पाटील, प्रमुख पाहुणे सहा.प्रा. सविता माळी – जाधव, डॉ. दिपा बिरनाळे व मान्यवर यांचे हस्ते रोपट्यास पाणी घालून उदघाट्न करण्यात आले. त्यानंतर सहा.प्रा.पाटोळे व्ही.एन. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन केले. त्यानंतर प्राध्यापक मनोगतात सहा. प्रा. चांदणे.एस. व्ही, सहा.प्रा. माने.एस.जी., सहा.प्रा.माने आर. बी. यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे – सहा प्रा सविता माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. के पाटील यांनी आजच्या शिक्षकांना सध्या विद्यार्थ्यांकडून मानसन्मान कमी प्रमाणात मिळतो असा खेद व्यक्त केला. या कार्यक्रमाचे आभार सहा. प्रा. माने आर बी यांनी केले. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. होनमाने पी.पी. यांनी केले. यावेळी सर्व बी.एड., एम. एड चे सहयोगी, सहायक प्राध्यापक, इतर कर्मचारी उपस्थित होते.
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली. येथे 14 सप्टेंबर हिंदी दिन व प्रथमोपचार दिन साजरा”
शनिवार दि. 14/09/2024
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली. येथे 14 सप्टेंबर हिंदी दिन व प्रथमोपचार दिन साजरा करण्यात आला. ससदरच्या कार्यक्रमात सुरुवातीस कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.पी. के. पाटील, प्रमुख पाहुणे सहा.प्रा. सुरेखा माने, डॉ. दिपा बिरनाळे यांचे प्रशिक्षणार्थी आस्मा फकीर, वैष्णवी शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर बी.एड. प्रशिक्षणार्थी सुचिता जाधव यांनी हिंदी दिनाबाबत तसेच हर्षाली पाटील यांनी प्रथमोपचार दिनाबाबत मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे सहा. प्रा. माने एस जी मॅडम यांनी व सहा प्रा जाधव एस ए यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. के. पाटील यांनी नेमक्या शब्दात हिंदी दिन व प्रथमोपचार दिन का साजरे करावेत याविषयीं आपल्या मनोगतात सांगितले तसेच प्रथमोपचार पेटीमधील साहित्याचा कसा वापर करावा हेही आवर्जून सांगितले. कार्यक्रमाचे आभार ऋतुजा जाधव यांनी मानले तसेच साधना शिंदे व प्रणिता भगत यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे स्वागत प्रियांका साळुंखे तसेच प्रास्ताविक व सूत्रसंचालन स्नेहल शेटे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने केले. यावेळी बहुसंख्य बी. एड. एम. एड प्रशिक्षणार्थी तसेच सर्व बी.एड., एम. एड चे सहयोगी, सहायक प्राध्यापक, इतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास संस्था चेअरमन श्री. समीर बिरनाळे, संस्था डायरेकटर श्री. सागर बिरनाळे यांची प्रेरणा मिळाली.
