असाध्य रोगापासून सुटका होण्यासाठी व मनःशांतीसाठी योगासने फार महत्त्वाची -श्री.हर्षद गाडगीळ
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली. येथे “One Earth, One Health” या slogan च्या अनुषंगाने दि. 21/06/2025 रोजी योग दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी सुरुवातीला प्रमुख व्याख्याता व योग मार्गदर्शक म्हणून -श्री.हर्षद गाडगीळ ( विश्वयोगदर्शन केंद्र, मिरज) होते. यासंदर्भात त्यांनी असे सांगितले की, अभ्यास सुरू करण्यापूर्वी सूक्ष्म व्यायाम जरूर करावा. त्यामुळे स्नायू, मज्जातंतू व हाडांचे सांधे मोकळे होवून हालचाली सुलभ होतील व आसनस्थिती जमण्यास सोपे होईल. त्यामुळे शरीर सुलभ होण्यासाठी योग फार महत्त्वाचे आहे, असे सांगितले. त्यानंतर ताडासन, अर्ध मत्स्यासन , द्विपादासन, कपालभारती, अनुलोम विलोम अशा विविध प्रकारची आसने करवून घेण्यात आली. यावेळी बी.एड.व एम.एड.चे सर्व प्रशिक्षणार्थी , प्राचार्य,सहयोगी प्राध्यापक, सहा. प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमासाठी संस्था चेअरमन श्री. समीर बिरनाळे, डायरेक्टर श्री. सागर बिरनाळे यांचा सततचा पाठिंबा असतो.