आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली. मध्ये “जागतिक ग्रंथपाल दिन” नवोपक्रमाने साजरा
सोमवार दि. 12/08/2024 आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये “राष्ट्रीय ग्रंथपाल दिन” उत्साहात संपन्न झाला. सुरवातीस सहा. प्रा. माने एस जी यांचे हस्ते दिपप्रज्वलन व एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात झाली.. यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप ग्रंथपाल वाघ तृप्ती यांनी स्पष्ट केले. तसेच ग्रंथालयाचे महत्व सांगितले त्याचप्रमाणे पुढे त्या म्हणाल्या, भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त (12 ऑगस्ट) राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृध्दींगत व्हावी यासाठी ग्रंथालयाचे असलेले महत्व आणि डॉ. रंगनाथन यांचे कार्य याविषयी माहिती सांगितली. ग्रंथालयशास्त्राचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय ग्रंथपाल
दिन साजरा केला जातो. ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था असून समाजाच्या हितासाठी ग्रंथालयाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. ग्रंथालयाचे जतन करणारा ग्रंथपालही महत्वाचा घटक आहे. ज्याप्रमाणे वाचकांच्या गरजा वाढतात, बदलतात त्याचप्रमाणे ग्रंथपालनाच्या कक्षाही वाढत जाणे आवश्यक आहे. भारतीय ग्रंथालयात साधारणतः 1965 नंतर संगणकाने प्रवेश केला. सर्वप्रथम Indian National Sicentific Documentation Center (INSDOC) मुंबई, Bharat Automic Reserach Center (BARC), BHEL आदी ठिकाणी ग्रंथालयात संगणकाचा वापर झाला. नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी जागेच्या प्रश्नाला पर्याय दिला खरा पण यामुळे ग्रंथालये नष्ट तर होणार नाहीत ना, अशी भीतीही व्यक्त होऊ लागली. मात्र, जुने सोडायचे नाही पण नवेही स्वीकारायचे, या धोरणावर ग्रंथपाल संगणकाचे ज्ञान अवगत करू लागला. ई-रिसोर्सेसमध्ये ई-बुक, ई-जर्नल्स, सीडी, डीव्हीडी, मायक्रोचिप, मायक्रोफॉर्म, कार्ड रिडर आदींचा समावेश होतो. तर पारंपरिक साधनांमध्ये लिखिते, हस्तलिखिते, ग्रंथ, नियतकालिके, नकाशे, गॅजेट्स आदींचा समावेश होतो. पुस्तकांच्या विश्वात काम करणारा ग्रंथपाल (लायब्ररियन) हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. या दोन्हीचा समन्यय राखण्यासाठी ग्रंथपालाला नेहमी प्रयत्नशील राहावे लागते. 12 ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो, ग्रंथालय विज्ञानाचे राष्ट्रीय प्राध्यापक, डॉ एसआर रंगनाथन (1892-1972), ज्यांनी भारतात ग्रंथालय विकासाचे नेतृत्व केले होते .
या दिवशी लोक एकत्र येऊन आपल्या समाजात ग्रंथालये आणि
ग्रंथपाल यांची महत्त्वाची भूमिका साजरी करतात. वाचन आणि पुस्तके प्रत्येकासाठी सुलभ आणि परवडणारी बनविण्याचे महत्त्व प्रतिबिंबित करण्याचा हा दिवस आहे ग्रंथालय आणि माहिती विज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या श्री. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा केला असेही त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एड. प्रशिक्षणार्थी कामिल नदाफ तर आभार बी एड प्रशिक्षणार्थी भरत खवाटे यांनी मानले यावेळी प्राचार्य डॉ पी. के. पाटील, सहा.प्रा.डॉ. दिपा बिरनाळे, यावेळी बहुसंख्य बी.एड.एम.एड. चे प्रशिक्षणार्थी तसेच एम.एड.चे सहयोगी प्रा.डॉ. इनामदार आर. आय., सहा. प्राध्यापक चांदणे. एस.व्ही., प्रा.पाटोळे व्हीं. एन. प्रा.होनमाने पी.पी., प्रा.माने एस. जी., प्रा.श्री. राहुल पाटील बी.एड.चे सहा.प्रा.माळी एस.के., श्री. किर्तीकर वाय. एस., प्रा.श्री. रमेश माने, प्रा. कदम व्ही.व्ही., श्री. समीर मुजावर, श्री. कौतुक काटकर इतर कर्मचारी, अमोल सकळे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास संस्था चेअरमन मा. श्री. समीर बिरनाळे सर, डायरेक्टर श्री. सागर बिरनाळे सर यांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य होते.