” वसंतदादा पाटील आयुर्वेद कॉलेज तर्फे बी.एड एम.एड. कॉलेज च्या कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न” शुक्रवार दि.20/06/2025 आरोग्य तपासणी शिबिर म्हणजे आरोग्य तपासणीसाठी आयोजित केलेले शिबिर. यात विविध आरोग्य तपासण्या जसे की, रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, वजन, उंची इत्यादी तपासल्या जातात. लोकांना त्यांच्या आरोग्याची माहिती मिळावी आणि आवश्यक असल्यास पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी शिबिरांचे आयोजन केले जाते. अशाच प्रकार श्री.वसंतराव बंडुजी पाटील ट्रस्टचे,वसंतदादा पाटील आयुर्वेद कॉलेज सांगली यांचेमार्फत शुक्रवारी दि. 20/06/2025 रोजी आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली या बी.एड.एम.एड शाखेतील प्राचार्य, प्राध्यापक तसेच इतर कर्मचारी यांचे मोफत जनरल बॉडी हेल्थ चेकअप करण्यात आले. सदर तपासणी मध्ये बी.पी., शुगर,कान नाक घसा, डोळे तपासणे तसेच युरीन,ब्लड चाचण्या तज्ज्ञ डॉक्टर कडून घेण्यात आल्या. यावेळी रुग्णालयात होणाऱ्या सर्व तपासण्या तसेच सर्व विभाग यामध्ये कशा प्रकारचे कार्य चालते याविषयी इतयंभूत माहिती मिळाली. यावेळी प्राचार्य, प्राध्यापक व इतर कर्मचारी यांना तपासणी दरम्यान येणाऱ्या शंकाचे समाधान करण्यात आले. सर्व उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी संस्था चेअरमन श्री. समीर बिरनाळे सर व संस्था डायरेक्टर श्री. सागर बिरनाळे सर यांचा सतत पाठिंबा असतो