“आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली.बी.एड. व एम.एड.च्या विद्यार्थ्यांचे शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत दैदीप्यमान यश” शिवाजी विद्यापीठ बी.एड. एम.एड.शैक्षणिक वर्ष 2023-25 परीक्षेत गुणवत्ता यादीत आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली.मधील प्रशिक्षनार्थ्यांनी अनुक्रमे बी.एड.विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रियांका भूषण कवठेकर यांचा नववा क्रमांक तसेच एम.एड. मध्ये सूर्यवंशी नलिनी महेश यांचा तिसरा क्रमांक, वारंग श्रुती जयसिंग यांचा चौथा क्रमांक ,नांदुरकर ऋतुजा गजानन पाचवा क्रमांक प्राप्त केला. या यशाबद्दल संस्था चेअरमन श्री.समीर बिरनाळे सर, संस्था डायरेकटर श्री. सागर बिरनाळे सर, तसेच प्राचार्य डॉ.पी.के.पाटील, उपप्राचार्य डॉ.दीपा बिरनाळे यांनी अभिनंदन केले.
