आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन (B.Ed.) च्या वतीने रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या “दंडोबा डोंगर” परिसरात विशेष ‘श्रमसंस्कार शिबीर ‘अत्यंत उत्साहात राबविण्यात आले.
भावी शिक्षकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी 8.00 वाजता महाविद्यालयाचे उपप्राचार्या डॉ. डी.एस बिरनाळे, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी महाविद्यालयातून बस ने दंडोबा परिसरात एकत्र आले. यावेळी विद्यार्थ्यांना विविध गटांत विभागून संपूर्ण मंदिर परिसर, ट्रेकिंग मार्ग आणि विश्रांतीच्या ठिकाणांची स्वच्छता केली. यामध्ये प्रामुख्याने:
1)प्लॅस्टिक पिशव्या, रिकाम्या बाटल्या आणि कचरा गोळा करण्यात आला.
2)पर्यटकांना निसर्गाचे महत्त्व सांगणारे फलक दाखवून जनजागृती करण्यात आली.
3)संकलित केलेला कचरा योग्य व्यवस्थापनासाठी नियोजित ठिकाणी सुपूर्द करण्यात आला.तसेच प्रशिक्षनार्थीकडून वृक्षारोपण करून घेण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या उप-प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. आपण स्वतः कृतीतून स्वच्छता पाळली, तरच आपण उद्याच्या पिढीला पर्यावरणाचे धडे देऊ शकू. दंडोबा सारख्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.”
या मोहिमेत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने छात्राध्यापक (B.Ed. Students) सहभागी झाले होते. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.असे उपक्रम वेळोवेळी करण्यासाठी संस्था चेअरमन श्री.समीर बिरनाळे सर संस्था डायरेक्टर श्री.सागर बिरनाळे सर यांच्या पाठिंबा फार महत्वाचा ठरतो व त्यामुळे काम करताना नवी उभारी मिळते.





