“गुरूंचे आशीर्वाद आणि त्यांची शिकवणच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात.” – डॉ.दीपा बिरनाळे, सांगली दि.10/07/2025
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली. येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सुरुवातीस सहा.प्रा.पाटोळे व्ही.एन. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना त्यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. त्यानंतर या कार्यक्रमात विद्यार्थी मनोगतात राधिका काळे अश्विनी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच प्रमिला सुतार यांनी आपल्या मधुर गायनाने उपस्थित शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली प्रमुख पाहुणे सहा.प्रा.माने आर.बी.यांनी गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच गुरु शिष्य परंपरा सध्या लोप पावत चालली असल्याने खरंच याबाबत विचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सहा.प्रा.डॉ.दीपा बिरनाळे यांनी गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? या प्रश्नाचे समर्पक उत्तर देत असताना ” तत्त्वज्ञानात्परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ॥” या महावाक्याचा अर्थ सांगताना त्यांनी गुरु म्हणजे स्वधारणा होय असे स्पष्ट केले. गुरुपौर्णिमेला पौर्णिमेचे तेज गुरुंचे आशीर्वाद आणि शिकवण वाढवते. आध्यात्मिक साधना, ध्यान आणि आत्मचिंतनासाठी एक आदर्श वातावरण तयार करते . ही पौर्णिमेची तेजस्वी रात्र ज्ञान, स्पष्टता आणि आंतरिक शांती मिळविण्यासाठी एक योग्य वेळ आहे. असेही त्या पुढे म्हणाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती पाटील तर आभार प्रतीक्षा चौगुले यांनी मानले. सदर कार्यक्रमास चेअरमन श्री.समीर बिरनाळे सर, डायरेकटर श्री.सागर बिरनाळे सर यांची प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच असे कार्यक्रम यशस्वी होतात.

