जागतिक महिला दिन
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोमवार, दिनांक ९ मार्च २०२६ रोजी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे आणि स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ डी.एस. बिरनाळे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणातून महिलांचे शिक्षण आणि स्वावलंबन यावर प्रकाश टाकला.
महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महिला सक्षमीकरणावर आधारित कविता, भाषणे सादर केली. आजच्या काळात महिला सर्वच क्षेत्रांत कशा प्रकारे आघाडीवर आहेत, याचे दर्शन या सादरीकरणातून घडले.
महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

