Skip to content
logo final

SHRI VASANTRAO BANDUJI PATIL TRUST’S

APPASAHEB BIRNALE COLLEGE OF EDUCATION, SANGLI

B.Ed & M.Ed

Shinde Mala, Near Railway Station, Sangli (M.S.) 416 416 (0233) 2313333 Fax 2313366

Approved by NCTE New Delhi and Govt. of Maharashtra, Affiliated to Shivaji University Kolhapur, Accredited by NAAC with “B” Grade and 2.14 CGPA till 2029

NAAC-02-1

NCTE Code No: B.Ed APW06146 / 123759

NCTE Code No : M.Ed APW07910 / 125233 / 123759

मंगळवार दि.12/08/2025 आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये “राष्ट्रीय ग्रंथपाल दिन”उत्साहात संपन्न झाला.

“समाजाच्या हितासाठी ग्रंथालयाचे संवर्धन करणे आवश्यक आहे- ग्रंथपाल तृप्ती वाघ”

सांगली,मंगळवार दि.12/08/2025 आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये “राष्ट्रीय ग्रंथपाल दिन”उत्साहात संपन्न झाला. सुरवातीस सहा.डॉ. दीपा बिरनाळे यांचे हस्ते दिपप्रज्वलन व एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात झाली . .यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप ग्रंथपाल वाघ तृप्ती यांनी स्पष्ट केले.तसेच ग्रंथालयाचे महत्व सांगितले त्याचप्रमाणे पुढे त्या म्हणाल्या,भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त (12 ऑगस्ट) राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृध्दींगत व्हावी यासाठी ग्रंथालयाचे असलेले महत्व आणि डॉ.रंगनाथन यांचे कार्य याविषयी माहिती सांगितली.
ग्रंथालयशास्त्राचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो.
ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था असून समाजाच्या हितासाठी ग्रंथालयाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. ग्रंथालयाचे जतन करणारा ग्रंथपालही महत्वाचा घटक आहे. ज्याप्रमाणे वाचकांच्या गरजा वाढतात, बदलतात त्याचप्रमाणे ग्रंथपालनाच्या कक्षाही वाढत जाणे आवश्यक आहे. भारतीय ग्रंथालयात साधारणत: 1965 नंतर संगणकाने प्रवेश केला. सर्वप्रथम Indian National Sicentific Documentation Center (INSDOC) मुंबई, Bharat Automic Reserach Center (BARC), BHEL आदी ठिकाणी ग्रंथालयात संगणकाचा वापर झाला. नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी जागेच्या प्रश्नाला पर्याय दिला खरा पण यामुळे ग्रंथालये नष्ट तर होणार नाहीत ना, अशी भीतीही व्यक्त होऊ लागली. मात्र, जुने सोडायचे नाही पण नवेही स्वीकारायचे, या धोरणावर ग्रंथपाल संगणकाचे ज्ञान अवगत करू लागला. ई-रिसोर्सेसमध्ये ई-बुक, ई-जर्नल्स, सीडी, डीव्हीडी, मायक्रोचिप, मायक्रोफॉर्म, कार्ड रिडर आदींचा समावेश होतो. तर पारंपरिक साधनांमध्ये लिखिते, हस्तलिखिते, ग्रंथ, नियतकालिके, नकाशे, गॅजेट्‍स आदींचा समावेश होतो. पुस्तकांच्या विश्वात काम करणारा ग्रंथपाल (लायब्ररियन) हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. या दोन्हीचा समन्यय राखण्‍यासाठी ग्रंथपालाला नेहमी प्रयत्नशील राहावे लागते. 12 ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो, ग्रंथालय विज्ञानाचे राष्ट्रीय प्राध्यापक, डॉ एसआर रंगनाथन (1892-1972), ज्यांनी भारतात ग्रंथालय विकासाचे नेतृत्व केले होते .
या दिवशी लोक एकत्र येऊन आपल्या समाजात ग्रंथालये आणि ग्रंथपाल यांची महत्त्वाची भूमिका साजरी करतात. वाचन आणि पुस्तके प्रत्येकासाठी सुलभ आणि परवडणारी बनविण्याचे महत्त्व प्रतिबिंबित करण्याचा हा दिवस आहे ग्रंथालय आणि माहिती विज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या श्री. एस.आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा केला असेही त्या म्हणाल्या. यावेळी बी.एड.एम.एड.चे सर्व प्राध्यापक, तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.सदरचे कार्यक्रम संस्था चेअरमन मा.श्री.समीर बिरनाळे सर, डायरेक्टर श्री.सागर बिरनाळे सर यांच्या पाठिंब्यामुळे उत्कृष्टपणे करण्यास शक्य होते.