Skip to content
logo final

SHRI VASANTRAO BANDUJI PATIL TRUST’S

APPASAHEB BIRNALE COLLEGE OF EDUCATION, SANGLI

B.Ed & M.Ed

Shinde Mala, Near Railway Station, Sangli (M.S.) 416 416 (0233) 2313333 Fax 2313366

Approved by NCTE New Delhi and Govt. of Maharashtra, Affiliated to Shivaji University Kolhapur, Accredited by NAAC with “B” Grade and 2.14 CGPA till 2029

NAAC-02-1

NCTE Code No: B.Ed APW06146 / 123759

NCTE Code No : M.Ed APW07910 / 125233 / 123759

मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळा

मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळा
दिनांक: २७ आणि २८ फेब्रुवारी २०२६
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथे ‘मराठी भाषा गौरव दिन’ (कुसुमाग्रज जयंती) आणि ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ (सी.व्ही. रमण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ) अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आले. ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालत भाषेचा अभिमान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात मराठी साहित्यातील दिग्गज कवी कुसुमाग्रज आणि थोर शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आली.
* अध्यक्षस्थान: महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. डी.एस. बिरनाळे मॅडम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करतानाच, भावी शिक्षकांनी विज्ञानाची कास धरून अध्यापन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
* प्रमुख उपस्थिती: या प्रसंगी सहयोगी प्राध्यापिका जाधव एस.ए. मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी ‘मराठी भाषा आणि विज्ञान’ यांचा दैनंदिन जीवनातील परस्परसंबंध यावर आपले विचार मांडले व वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारावा असे अधोरेखित केले.
कार्यक्रमातील ठळक वैशिष्ट्ये
या संयुक्त कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाविद्यालया च्या’मराठी साहित्यिक माहितीपर पोस्टर प्रदर्शन’ हे होते.
मराठी साहित्यिक माहितीपर पोस्टर प्रदर्शन’ याचे उद्घाटन लेखक संदिप पवार सर यांनी केले.
या प्रदर्शनाद्वारे मराठी साहित्यातील दिग्गज कवी, कादंबरीकार आणि नाटककार यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्यात आला.विद्यार्थ्यांमार्फत कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त काही विद्यार्थ्यांनी विज्ञानातील नवनवीन बदलांची माहिती दिली.
मनोगते: महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी दोन्ही दिवसांचे औचित्य साधून आपली मनोगते व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ. डी.एस. बिरनाळे मॅडम यांनी या कार्यक्रमामुळे भावी शिक्षकांमध्ये मातृभाषेप्रती आदर आणि वैज्ञानिक विचारांची रुजवणूक होण्यास मदत झाली. छात्राध्यापक रितेश सलगर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली