editor
Posts by :
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये नवरात्री निमित्त हादगा व दांडिया उत्साहात संपन्न
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये नवरात्री निमित्त हादगा व दांडिया उत्साहात संपन्न”* सांगली गुरुवार दि.10/10/2024 आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली. येथे हादगा तसेच रास दांडियाचे नियोजन करण्यात आले होते. सकाळपासून सर्व बी.एड., एम.एड. प्रशिक्षणार्थिनी विविध प्रकारच्या वेशभूषेत आले होते. (राधा, गवळणी, कृष्ण, गोपिका इ.) तसेच सर्व प्राध्यापकांनी देखील त्या स्वरूपात आपल्या वेशभूषा केल्या होत्या त्यांनी सर्व विदयार्थ्यांकडून अतिशय छान पद्धतीने गरबा नृत्याची तयारी करवून घेतली होती. तसेच सर्व प्रशिक्षणार्थी तसेच प्राध्यापकांनी देखील त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तसेच त्यापूर्वी हादगा व गरबा या पारंपरिक नृत्याचे कौशल्य प्रशिक्षणार्थीत निर्माण व्हावा हादेखील त्यामागील प्रमुख उद्देश होता. यादरम्यान विदयार्थ्यांनी हादगा साजरा करताना आणलेल्या विविध खाद्यपदार्थाचा आस्वाद सर्वांनी मिळून घेतला. त्यामुळे एक वेगळा आनंद सर्वांना प्राप्त झाला. यावेळी बहुसंख्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्राचार्य डॉ पी. के. पाटील सर्व बी.एड. एम.एड.चे सहा. प्राध्यापक यांनी सर्व कार्यक्रम छान पद्धतीने पार पडतील यासाठी खूप मेहनत घेतली. त्यामुळे हा कार्यक्रम उत्कृष्ट झाला.
“आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मधील एम.एड. विभागातील शैक्षणिक वर्ष 2022-24 परीक्षेत शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत सात विदयार्थ्यांचे सुयश “
“आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मधील एम.एड. विभागातील शैक्षणिक वर्ष 2022-24 परीक्षेत शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत सात विदयार्थ्यांचे सुयश ”
शनिवार दि.24/08/2024
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मधील एम.एड. विभागातील शैक्षणिक वर्ष 2022-24 परीक्षेत शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत एकूण सात क्रमांक पटकावले आहेत. ते गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे –
विद्यापीठात प्रथम-मालेकर सारिका किसन
विद्यापीठात द्वितीय-तांडेल श्रद्धा विजय
विद्यापीठात तिसरा पाटील अनिता पोपट
विद्यापीठात चौथा अजेंठराव धनश्री गजानन विद्यापीठात सातवा – कुंभार माधुरी सुनील
विद्यापीठात आठवा – कुरळपकर प्रज्ञा
परीक्षित विद्यापीठात नववा – शेजाळ नानासाहेब दगडू
या प्रशिक्षणार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. के पाटील सर, सहायक प्रा.डॉ दिपा बिरनाळे, सहयोगी प्रा. डॉ. रिहाना इनामदार, सहा.प्रा.चांदणे एस व्ही, सहा. प्रा. पाटोळे व्ही एन, सहा. प्रा. पाटील आर. ए. सहा.प्रा. होनमाने पी.पी, सहा. प्रा. माने एस जी. तसेच बी.एड स्टाफ सहा.प्रा. कीर्तिकर वाय एस, सहा. प्रा. माळी एस. के., सहा.प्रा.माने आर.बी. यांचे मार्गदर्शन मिळाले.तसेच संस्था चेअरमन श्री समीर बिरनाळे, डायरेकटर श्री. सागर बिरनाळे यांची प्रेरणा मिळाली.
“आप्पासाहेब बिरनाळे बी.एड. कॉलेज शैक्षणिक वर्ष 2022-24 चा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न “
“आप्पासाहेब बिरनाळे बी.एड. कॉलेज शैक्षणिक वर्ष 2022-24 चा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न ”
गुरुवार दि.25/04/2024 आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथे शैक्षणिक वर्ष 2022-24 च्या छात्रध्यापकांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी बी एड छात्रध्यापिका महादेवी नागापुरे यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी छत्रध्यापकांनी महाविद्यालयास एक आठवण रूपाने छोटीशी भेट म्हणून 1 cooler व 1 Water Purifier देण्यात आला. त्यानंतर एकूण बी एड मधील दोन वर्षाच्या कालावधीत आलेले अनुभव अनंत शहापुरे, रमेश खबाले, विश्वभर बंडगर, नम्रता एरंडोले यांनी शेअर केले. त्यानंतर प्राध्यापक मनोगतात सहा प्रा एस के माळी व सहा प्रा वाय एस कीर्तिकर यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ पी. के. पाटील सर यांनी आपण फक्त परीक्षार्थी न राहता आजन्म विदयार्थी असावे व त्यानुसार इथून पुढील आपल्या हाती येणाऱ्या सर्व पिढ्याना खरे ज्ञान प्राप्त होण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे सांगितले. शेवटी छात्रध्यापिका सुचेता पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. व कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमास प्राचार्य डॉ पी के पाटील डॉ दीपा बिरनाळे सहा प्रा एस के माळी सहा प्रा वाय एस कीर्तिकर, सहा प्रा माने आर बी, सहा प्रा चांदणे एस व्ही सहा प्रा पाटोळे व्ही एन सहा प्रा होनमाने पी पी सहा प्रा माने एस बी सहा प्रा कदम व्ही व्ही सहयोगी प्रा डॉ आर आय इनामदार सहा प्रा राहुल पाटील, समीर मुजावर, कौतुक काटकर, भारत खवाटे, अमोल इ. उपस्थित होते सदर कार्यक्रमांस संस्था चेअरमन श्री समीर बिरनाळे, संस्था डायरेकटर श्री सागर बिरनाळे यांनी शुभेच्छा दिल्या व असेच विद्यार्थी आपल्या संस्थेतून आपले नाव उज्ज्वल करोत अशा सदिच्छा दिल्या.
आप्पासाहेब बिरनाळे एम. एड. महाविद्यालयात 2022-24 प्रशिक्षणार्थिचा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न..
आप्पासाहेब बिरनाळे एम. एड. महाविद्यालयात 2022-24 प्रशिक्षणार्थिचा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न..* शनिवार दि.25/05/2024 आप्पासाहेब बिरनाळेकॉलेज ऑफ एज्युकेशन (एम. एड.) सांगली. महाविद्यालयात 2022-24 मधील प्रशिक्षणार्थिंचा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एम.एड. अभ्यास क्रम एकूण दोन वर्षात व चार सेमिस्टर मध्ये पूर्ण केला जातो. त्यांतर्गत विविध प्रा त्यक्षिके, सेमिनार तसेच इतर सर्व कार्य पूर्ण करून घेतले जाते.. सदर परीक्षा कालच संपल्या व त्यानुसार आज त्यांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ या सर्व प्रशिक्षणार्थिनी स्वयंस्पुर्थीने आयोजित केला होता. यामध्ये महादेव केदार, नानासाहेब शेजाळ इतर सर्व सेम IV च्या प्रशिक्षणार्थिनी अतिशय योग्य नियोजन केले होते. सुरवातीला सर्व उपस्थितानी अतिशय स्वादिष्ट अशा भोजनाचा आस्वाद घेतला. व प्रत्यक्ष कार्यक्रमाचे उदघाट्न एका रोपट्यास पाणी घालून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश शिंदे यांनी तर सूत्रसंचलन महादेव केदार यांनी केले होते. सुरवातीला माधुरी कुंभार, धनश्री अजेठराव, अनिता पाटील, नानासाहेब शेजाळ, महादेव केदार, दीपाली माने इ प्रशिक्षणार्थिनी नी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सहा.प्रा. कीर्तिकर वाय एस, सहा.प्रा. चांदणे एस. व्ही., सहा.प्रा.पाटोळे व्ही. एन. सहा.प्रा.होनमाने पी.पी., सहा.प्रा.माने एस. जी. यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर सर्व मान्यवरांना भेट वस्तू 2022-24 च्या प्रशिक्षणार्थी चे हस्ते देण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. के. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. व प्रशिक्षणार्थिना मार्गदर्शन केले. यावेळी सहा प्रा.डॉ. दिपा बिरनाळे, सहा. प्रा. जाधव एस.ए सहयोगी प्रा. डॉ इनामदार आर आय, सहा प्रा. पाटील आर ए., ग्रंथपाल वाघ टी. ए., श्री. समीर मुजावर, श्री कौतुक काटकर, भरत खवाटे, अमोल सकळे उपस्थित होते. यावेळी सेम IV मधील सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमांस संस्था चेअरमन श्री. समीर बिरनाळे सर, संस्था डायरेकटर श्री. सागर बिरनाळे सर, यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या पाठिंब्यामुळे सदरचे कार्यक्रम यशस्वी होत आहेत.
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली. येथे NAAC Peer Team Visit संपन्न *
* आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली. येथे NAAC Peer Team Visit संपन्न *
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली. येथे NAAC Peer Team Visit संपन्न झाली. दि. 12/06/2024 व दि. 13/06/2024 या दोन दिवसात सदरची नॅक कमिटी महाविद्यालय तपासणीसाठी आलेले होते. यामध्ये तीन सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये Prof. (Dr.Subrata Saha, Dr. Renu Nanda, Dr. Albert Dkhar त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. चे एक प्रतिनिधी उपस्थित होतेपहिल्या दिवशी महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य डॉ.पी. के. पाटील सर, डॉ. दिपा बिरनाळे, तसेच सर्व बी.एड.एम.एड. सहयोगी व सहाय्यक प्राध्यापक, सर्व प्रशिक्षणार्थी यांनी कोल्हापुरी फेटा नेसवून, औक्षण करून तसेच पुष्प गुच्छ देऊन अतिशय छान पद्धतीने स्वागत केले. त्यानंतर एकूण सातही criteria नुसार NAAC कमिटीने सर्व कागदपत्रे व महाविद्यालय सोयीसुविधा यांच्या विषयी कामकाजाची माहिती घेतली. बी.एड. व एम. एड. च्या प्रत्येक विभागा ची, ICT लॅब, Psychology लॅब, लायब्ररी facility, विद्यार्थी पालक यांचेबरोबर मीटिंग, सुसंज्ज स्पोर्ट्स room, मेस, playground, भौतिक सोयी, प्राध्यापक मिटिंग, एम. एड संशोधन, बी.एड. कृतिसंशोधन, भव्य सांस्कृतिक विभाग, पार्किंग व्यवस्था, Water refiling सिस्टिम, water purifier सिस्टिम, योगाauditorium hall, Swimming Tank, Tree Plantation, आर्टस् and क्राफ्ट, फोटो प्रदर्शन etc. या सर्वांची पाहणी या peer टीमने दोन दिवसात केली. व दि. 13/06/2024 रोजी यशस्वी सांगता केली. संस्था चेअरमन.श्री. समीर बिरनाळे डायरेकटर श्री सागर बिरनाळे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले.
Yoga Day Celebration
oga Day Celebration (late post)
मन शांत व एकाग्र होण्यासाठी योगासने फार महत्त्वाची – सौ. ए. एस. चौगुले
आप्पासाहेब बिरनाळे कालेज ऑफ एज्युकेशन सांगली येथे दि. 21/06/2024 रोजी योग दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी सुरवातीला प्रमुख व्याख्याती म्हणून – सौ. ए. एस. चौगुले एम एड च्या माजी विद्यार्थिनी होत्या. यासंदर्भात त्यांनी असे सांगितले की, अभ्यास सुरू करण्यापूर्वी सूक्ष्म व्यायाम जरूर करावा. त्यामुळे स्नायू, मज्जातंतू व हाडांचे सांधे मोकळे होवून हालचाली सुलभ होतील व आसनस्थिती जमण्यास सोपे होईल. त्यामुळे शरीर सुलभ होण्यासाठी योग फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर प्रमुख उपस्थिती असणाऱ्या डॉ दिपा बिरनाळे यांनी प्रशिक्षणार्थी कडून विविध प्रकारचे आसने करवून घेतली. यावेळी बी.एड. व एम.एड.चे सर्व प्रशिक्षणार्थी, प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहा. प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मध्ये “गुरुपौर्णिमा” उत्साहात संपन्न
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मध्ये “गुरुपौर्णिमा” उत्साहात संपन्न
दि. 20/07/2024 आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मध्ये “गुरुपौर्णिमा” कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. पी. के. पाटील तर प्रमुख उपस्थिती सहा.प्रा.डॉ. दिपा बिरनाळे यांची होती. त्यानंतर एम. एड. व बी. एड प्रशिक्षणार्थी नी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये दिव्या पाटील,, वैशाली कारंडे, श्रुती पवार, इ चा समावेश होतो. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. के. पाटील यांनी गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देऊन आपल्या अध्यक्षीय मनोगतास सुरवात केली. ते म्हणाले, शिक्षकांने आयुष्यभर घडवलेल्या विद्यार्थ्यापैकी किमान डझनभर विद्यार्थ्यांना तरी आपण आपल्या नावीन्यपूर्ण, तसेच एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण गुणामुळे लक्षात राहिलो पाहिजे तर आणि तरच एक चांगला गुरु होउ शकतो. नसेल तर आपण फक्त शिक्षकच उरतो. त्यानंतर त्यांनी जीवनात जगण्यासाठी कुटुंब, मित्र, सहकारी यांचे बरोबर सौहार्दपूर्ण वातावरण राखणे का गरजेचे आहे. व आपण व्यावहारिक तेने कसे जगले पाहिजे हेदेखील दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे सांगून पटवून सांगितले, त्यानंतर एम.एड. प्रशिक्षणार्थी मोईन शिकलगार यांनी आभार मानले. यावेळी बी.एड.व एम.एड.चे बहुसंख्य प्रशिक्षणार्थी, सर्व बी.एड. व एम.एड.चे सर्व सहयोगी व सहायक प्राध्यापक, इतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमांस संस्था चेअरमनसो श्री समीर बिरनाळे सर तसेच संस्था डायरेकटरसो. श्री. सागर बिरनाळे सर यांचा सतत पाठिंबा असतो त्यामुळेच असे कार्यक्रम यशस्वी होतात. सदरच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन श्रुतिका शिंदे यांनी केले होते.
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मध्ये “School Connect Program” नावीन्यपूर्ण कार्यशाळा व Stakeholders meeting उत्साहात संपन्न
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मध्ये “School Connect Program” नावीन्यपूर्ण कार्यशाळा व Stakeholders meeting उत्साहात संपन्न
दि.27/07/2024 आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मध्ये “School Connect Program” नावीन्यपूर्ण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. NEP-2020 च्या अनुषंगाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम बी.एड. आंतरवासीता अंतर्गत होता. सदर कार्यक्रमामध्ये stakeholders ची meeting देखील आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रास्ताविक व स्वागत सहा.प्रा.डॉ. दिपा बिरनाळे यांनी केले. सहा. प्रा चांदणे एस व्ही. आणि सहा प्रा होनमाने पी.पी. यांचे हस्ते मान्यवर मुख्याध्यापकांचे स्वागत पुष्प देऊन करण्यात आले सहा.प्रा.डॉ. दिपा बिरनाळे यांनी केले तसेच कॉलेज चे IQAC Coordinator सहा.प्रा. कीर्तिकर वाय.एस. यांनी School Connect Program व Stakeholders meet याचे स्वरूप सविस्तरपणे सांगितले. त्यानंतर school connect program मध्ये सहभागी मुख्याध्यापक गरांडे सर, तसेच ढेरे सर, चौगुले मॅडम, भोंडवे सर करनाळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर यासंदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात आली विचारलेल्या शंकाचे निरसन डॉ पी. के. पाटील सर व सर्व प्राध्यापकांनी केले. त्यानंतर प्राचार्य डॉ.पी. के. पाटील सर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.यामध्ये कॉलेज च्या चाललेल्या वाटचालीबाबत माहिती दिली.झालेल्या सर्व चर्चेचा खुलासा करून उपस्थितांच्या सर्व प्रश्नांची
समर्पक उत्तरे दिली यादरम्यान सहा प्रा माने आर बी व सहा.प्रा. माने एस.जी.यांनी feedback फॉर्म देणे तसेंच नावनोदणी चे उत्तम कार्य वाघ मॅडम यांनी पार पाडले. तसेच जेवण विभाग (पाटोळे मॅडम, काटकर सर) तसेच सर्व विभागानी आपापले योग्य नियोजन केले होते त्यानंतर महाविद्यालयाच्या कॅन्टीन मध्ये हरिभाऊ यांनी बनवलेल्या दुपारच्या यथेच्छ भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतले त्याचबरोबर सर्वांनी या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमात पुढील कार्यशाळेचे विषय याबाबत चर्चा करण्यात आली. सदर कार्यक्रमात स्टेज व्यवस्था सहा प्रा माळी एस. के. तसेच आभार सहा प्रा होनमाने.पी पी. यांनी मानले या कार्यक्रमासाठी संस्था चेअरमन समीर बिरनाळे सर, डायरेकटरसो सागर बिरनाळे सर यांनी दिलेल्या सपोर्टमुळे अशा पद्धतीचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवले जातात.
“आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी “
“आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज मध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी ”
गुरुवार दि.01 ऑगस्ट 2024
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथे गुरुवार दि.01/08/2023 रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये सुरवातीस प्राचार्य डॉ पी. के. पाटील सर, डॉ दीपा बिरनाळे, सर्व बी. एड., एम.एड. चे सहा. प्राध्यापक यांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सुरवातीस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एम.एड. चे सहा.प्रा.श्री. चांदणे एस.व्ही. यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, अण्णा भाऊ साठे हे साहित्य, संगीत आणि सामाजिक कार्याच्या जगात एक अग्रगण्य प्रकाश होते, त्यांनी उपेक्षित समुदायांच्या संघर्षांना संबोधित करण्यासाठी त्यांच्या व्यासपीठाचा वापर केला. जातीय पदानुक्रम आणि आर्थिक विषमतेने ग्रासलेल्या समाजात आशेचे किरण म्हणून उभे राहिले, त्यांनी त्यांच्या शक्तिशाली शब्द आणि कृतींद्वारे यथास्थितीला आव्हान दिले. अण्णा भाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या छोट्याशा खेड्यातील त्यांचे जीवन त्या काळात प्रचलित असलेल्या सामाजिक आणि आर्थिक संकटांचा सामना करत होते. हे अनुभव नंतर त्यांच्या साहित्यकृतींमध्ये प्रतिबिंबित होतील, जिथे त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांच्या संघर्षांना आघाडीवर आणण्याचा प्रयत्न केला. असेही ते म्हणाले. यानंतर बी.एड.चे सहा.प्रा.श्री. रमेश माने यांनीदेखील अण्णा भाऊ यांचेबद्दल मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, औपचारिक शिक्षण नसतानाही, कथाकथन आणि लेखनासाठी अण्णा भाऊ साठे यांची जन्मजात प्रतिभा दिसून आली, मार्मिक कथा तयार केली जी आजही वाचकांच्या मनात कायम आहे. अण्णा भाऊ साठे यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या, प्रामुख्याने मराठी भाषेत, आणि त्यांची कामे जीवनातील कच्च्या वास्तवाचे कथन करण्याच्या त्यांच्या विलक्षण क्षमतेचा पुरावा म्हणून उभ्या आहेत. यापैकी “फकिरा” हा बहुधा त्यांचा उत्कृष्ट रचना मानला जातो. ही एक सशक्त कथा आहे जी उपेक्षित आणि शोषित वर्गाच्या सामाजिक-आर्थिक त्रासांना प्रतिबिंबित करते, सामाजिक अन्याय, जातीय भेदभाव आणि गरिबीच्या कठोर वास्तवाच्या थीम शोधते.
त्यांची साहित्यकृती केवळ कादंबऱ्यांपुरती मर्यादित नव्हती.
300 हून अधिक श्रेयासह ते लघुकथांचे विपुल लेखक देखील
होते. त्यांच्या कथनांमध्ये वैविध्य असताना, या कथा एका समान धाग्याने एकत्र आल्या त्यांनी शोषित आणि उपेक्षित समुदायांचे जीवन आणि संघर्ष प्रकाशात आणले. मराठी भाषेचा कुशल वापर, लोकपरंपरांच्या घटकांमध्ये मिसळून, अण्णा भाऊ साठे यांना व्यापक श्रोत्यांशी जोडले गेले. आवाजहीनांना आवाज देण्यासाठी, त्यांचे संघर्ष आणि आकांक्षा सहानुभूतीपूर्वक, खंबीरपणे मांडण्यासाठी त्यांनी आपल्या लेखनाचा प्रभावीपणे उपयोग केला. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींनी जाति-आधारित भेदभाव, आर्थिक विषमता आणि सामाजिक अन्याय यांसारख्या गुंतागुंतीच्या विषयांना तोंड देणे टाळले. हे विषय अण्णा भाऊ साठे यांच्यासाठी अत्यंत वैयक्तिक होते, त्यांनी उपेक्षित समाजात वाढलेल्या अनुभवातून रेखाटले होते. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. के. पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांचेबद्दल
बोलताना सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांची सक्रियता आणि राजकीय सहभाग हा केवळ त्यांच्या आयुष्याचा विस्तार नव्हता, तर सामाजिक न्यायासाठी त्यांच्या खोलवर असलेल्या बांधिलकीचे प्रकटीकरण होते. त्यांच्या अथक प्रयत्नांनी सामाजिक नियमांना आव्हान देण्यात आणि अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचे जीवन, सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी व्यक्तींच्या भूमिकेवर जोर देऊन, कार्यकर्त्यांना आणि राजकीय नेत्यांना सारखेच प्रेरणा देते. लोकमान्य टिळक यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की. लोकमान्य टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात. 1881 ते 1920 या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी 513 अग्रलेख लिहिले. तसेच लोकमान्य टिळकांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वायत्ततेसाठी लढा दिला. लोकमान्य टिळक हे जहालमतवादी नेते ओळखले जात असे. कार्यक्रमाच्या शेवटी सहा. प्रा. डॉ. दिपा बिरनाळे यांनी आभार मानले. यावेळी बहुसंख्य बी.एड.एम.एड.चे प्रशिक्षणार्थी तसेच एम.एड.चे सहयोगी प्रा. डॉ. इनामदार आर. आय., सहा. प्राध्यापक प्रा.पाटोळे व्हीं.एन. प्रा. होनमाने पी.पी., प्रा. माने एस. जी., प्रा.श्री. राहुल पाटील बी.एड.चे सहा.प्रा. माळी एस.के., श्री. किर्तीकर वाय. एस., प्रा.श्री. रमेश माने, प्रा. कदम व्ही. व्ही., ग्रंथपाल वाघ टी.ए. श्री. समीर मुजावर, श्री. कौतुक काटकर इतर कर्मचारी भरत खवाटे, अमोल सकळे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास संस्था चेअरमन मा.श्री. समीर बिरनाळे सर, डायरेक्टर श्री. सागर बिरनाळे सर हे कामाच्या व्यापामुळे प्रत्यक्ष जरी उपस्थित नसले तरी त्यांचे सततचे प्रोत्साहनामुळेच आम्हाला असे कार्यक्रम करण्यास उर्जा प्राप्त होते यात शंका नाही.
