editor
Posts by :
अग्रणी महाविद्यालयाअंतर्गत पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशनने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन…!
दिनांक :२ मार्च २०२६अग्रणी महाविद्यालयाअंतर्गत पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशनने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत आपल्या महाविद्यालयातील सुषमा घाडगे हिने पहिला क्रमांक व श्वेता पाटील हिने तिसरा क्रमांक पटकावला तसेच पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत सविता साळुंखे हिने दुसरा क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली स्टाफ, प्रशासन तर्फे खूप खूप अभिनंदन💐
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एजुकेशन सांगली येथे रांगोळी प्रदर्श
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एजुकेशन सांगली येथे रांगोळी प्रदर्श
आप्पासाहेब बिरनाळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात (Appasaheb Birnale College of Education) विद्यार्थ्यांसाठी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली.
आप्पासाहेब बिरनाळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ‘व्यक्तिमत्व विकास’ कार्यशाळा संपन्न
आप्पासाहेब बिरनाळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात (Appasaheb Birnale College of Education) विद्यार्थ्यांसाठी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. “संवाद कौशल्य हीच यशाची गुरुकिल्ली”या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून सुप्रसिद्ध वक्त्या लता स्वामी उपस्थित होत्या.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना लता स्वामी यांनी भावी शिक्षकांसाठी व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “शिक्षक हा समाजाचा आरसा असतो, त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व केवळ बाह्य रूपाने नाही तर विचारांनी आणि संवाद कौशल्याने समृद्ध असावे. आत्मविश्वास आणि सकारात्मक देहबोली (Body Language) आत्मसात केल्यास तुम्ही एक आदर्श शिक्षक म्हणून नावारूपास येऊ शकता.”
लता स्वामी यांनी खालील मुद्द्यांवर सविस्तर प्रकाश टाकला-
प्रभावी सादरीकरण: वर्गात अध्यापन करताना आवाजातील चढ-उतार आणि संवाद कसा असावा.
मानसिक सक्षमता: ताणतणावाचे नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन.
नेतृत्व गुण: विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता कशी विकसित करावी.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बी.एड. विभागाची विद्यार्थिनी यांनी केले या प्रसंगी महाविद्यालयाचे उप -प्राचार्या डॉ दीपा बिरनाळे , प्राध्यापक वृंद आणि बी.एड.चे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे शिक्षकी पेशात पदार्पण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तसेच आपल्या संस्थेचे चेअरमन मा. श्री समीर बिरनाळे व संस्थेचे डायरेक्टर मा. श्री सागर बिरनाळे सर यांची प्रेरणा असल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना सतत यश मिळत आहे.
अप्पासाहेब बिरनाळे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सांगली यांच्या वतीने १ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जनजागृतीपर प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक एड्स दिनानिमित्त अप्पासाहेब बिरनाळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे प्रभातफेरी आणि जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न!”
अप्पासाहेब बिरनाळे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सांगली यांच्या वतीने १ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जनजागृतीपर प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. ‘एड्स’ (AIDS) या गंभीर रोगाबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे आणि प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व पटवून देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सकाळच्या सत्रात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सहभाग घेत शहरातून जनजागृतीपर प्रभातफेरी काढली. यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एड. प्रशिक्षणार्थी ऋतुजा जाधव हिने प्रभावीपणे केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक किर्तीकर सर यांनी करून दिली, तसेच जागतिक एड्स दिनाचे महत्त्व आणि एड्सच्या प्रसाराबद्दल माहिती दिली.
यावेळी प्रशिक्षणार्थींच्या वतीने भक्ती, स्नेहल रोटे आणि रितेश यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एड्सवरील नियंत्रण आणि सामाजिक सहभाग या विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले.
महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक एस. व्ही. चांदणे सर यांनी प्राध्यापकांचे मनोगत व्यक्त करताना एड्स संदर्भातील गैरसमज दूर करणे व शिक्षकाची भूमिका यावर विशेष मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डी. एस. बिरनाळे मॅडम यांनी एड्सग्रस्तांना सहानुभूती आणि पाठिंबा देण्याचे आवाहन केले. एड्सची भीती न बाळगता योग्य माहिती व उपचारांनी यावर नियंत्रण मिळवता येते, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला.अखेरीस, बी.एड. प्रशिक्षणार्थी सीमा हिने उपस्थित सर्व मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थी यांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशिक्षणार्थी व बीएड व M.ed सर्व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच आपल्या संस्थेचे चेअरमन मा. श्री समीर बिरनाळे व संस्थेचे डायरेक्टर मा. श्री सागर बिरनाळे सर यांची प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले, त्यामुळेच असे कार्यक्रम समाजात आपला ठसा उमटवतात.
“आज मतदान – उद्याचे सक्षम शहर”
सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणूक ही आपल्या शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शहराच्या स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांवर आपल्या एका मताचा थेट परिणाम होतो.
तरी सर्वानी निवडणुकीच्या दिवशी आवर्जून मतदान करावे, तसेच कुटुंबातील इतर पात्र मतदारांनाही मतदानासाठी प्रेरित करावे, ही नम्र विनंती.
आपला सहभाग म्हणजेच आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेले योगदान आहे.
“आज मतदान – उद्याचे सक्षम शहर”
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली. येथील बी.एड. प्रशिक्षणार्थिनी विद्याशाखा आणि विषयाचे आकलन या विषयाच्या प्रातेक्षिकांतर्गत द्राक्षबाग शेती तसेच बेदाणे कोल्ड स्टोरेज केंद्रास भेट दिली
“आप्पासाहेब बिरनाळे बी. एड. प्रशिक्षणार्थ्यांची द्राक्षबाग शेती तसेच बेदाणे कोल्ड स्टोरेज केंद्रास उद्योगाभिमुख भेट ”
बुधवार दि. 10/12/2025
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली. येथील बी.एड. प्रशिक्षणार्थिनी विद्याशाखा आणि विषयाचे आकलन या विषयाच्या प्रातेक्षिकांतर्गत द्राक्षबाग शेती तसेच बेदाणे कोल्ड स्टोरेज केंद्रास भेट दिली
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर बी.एड.अभ्यासक्रमांतर्गत द्राक्ष शेती भेट तसेच कल्पवृक्ष कोल्ड स्टोरेज केंद्रास भेट आज आयोजित करण्यात आली होती. यामध्ये द्राक्ष शेती भेटी अंतर्गत एकूण बागेच्या structure उभारणी, द्राक्ष रोपे Drafting करण्यापासून त्याचे संगोपन करणे, पूर्ण वाढीसाठी लागणारा कालावधी, तसेच द्राक्षबाग पूर्ण त्वास येईपर्यंत त्यास येणारा सर्व खर्च याबाबत मा.श्री. कवठेकर सर यांनी इत्यंभूत माहिती दिली. त्याआगोदर त्यांनी जवळपास एक एकरातील बनवलेला पाण्याचा तलाव, जवळपास 11 एकर क्षेत्रात केलेली तीन द्राक्षांच्या जाती कशा पद्धतीने लागवड केली आहे. याची माहिती त्यांनी सर्वांना दिली. या द्राक्षबागेत फिरताना शेतकऱ्याने केलेली मेहनत लक्षात आली. प्रत्यक्षात उत्पन्न घेताना त्या कालावधीत किती कष्ट सहन करून हे पीक घेतात याची प्रचिती आली.
त्यानंतर कल्पवृक्ष कोल्ड स्टोरेज केंद्रास भेट आज आयोजित करण्यात आली होती.त्याठिकाणी तेथील श्री. खोत सर यांनी तेथील कार्य कसे चालते याविषयीं आम्हाला माहिती दिली. यामध्ये बेदाणा, तसेच हळद, अशा शेतकऱ्यांच्या मालाला इथे cooling स्टोरेज करिता प्रति टन सरासरी किती खर्च येतो याबाबत माहिती दिली. याबरोबरच Compressor machine कसे कार्य करते.? या unit ची एकूण माल ठेवण्याची capacity याविषयीं मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सर्व cold स्टोरेज चे management व work पहिल्यानंतर श्री खोत यांनी या युनिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाचे कसेसंरक्षण होते याविषयींदेखील माहिती दिली. आणि तेथील भेट संपन्न झाली. सदरच्या दोन्ही भेटी अविस्मरणीय ठरल्या यावेळी बी. एड. प्रशिक्षणार्थिसोबत महाविद्यालयाच्या उप- प्राचार्या डॉ. दिपा बिरनाळे, सहा. प्रा. जाधव एस. ए. सहा. प्रा. चांदणे एस. व्ही. सहा. प्रा. होनमाने पी. पी. उपस्थित होते. या सर्व महाविद्यालयीन उपक्रमास संस्था चेअरमन श्री समीर बिरनाळे,संस्था डायरेकटर सागर बिरनाळे यांचे सततचे पाठबळ असलेमुळेच अशा भेटी यशस्वी होतात.
अप्पासाहेब बिरनाळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात २६ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘संविधान दिन’ (Constitution Day) अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
हमारा संविधान – हमारा स्वाभिमान’ अप्पासाहेब बिरनाळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा!
सांगली:
येथील श्री वसंतराव बंडूजी पाटील ट्रस्ट संचलित अप्पासाहेब बिरनाळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात २६ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘संविधान दिन’ (Constitution Day) अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे महत्त्व आणि त्यातील मूल्यांविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘हमारा संविधान – हमारा स्वाभिमान’ या शीर्षकाखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. दीपा बिरनाळे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक समितीने विशेष नियोजन केले होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख सहा. प्रा. किर्तीकर वाय. एस. आणि उपप्रमुख सहा. प्रा. माने एस. जी. यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.एड. प्रशिक्षणार्थी स्नेहल कर्पे यांनी केले, ज्यात भारतीय संविधानाचा इतिहास आणि २६ नोव्हेंबरचे महत्त्व स्पष्ट केले.
प्रशिक्षणार्थी अमृता चव्हाण हिने कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुंदर फलकलेखन केले. सविता साळुंखे आणि साधना पाटील यांनी कार्यक्रमाच्या औचित्यानुसार व्यासपीठाची उत्कृष्ट सजावट केली.यावेळी प्राध्यापक मनोगत सहा. प्रा. कीर्तिकर वाय. एस. यांनी व्यक्त केले,
उपप्राचार्या डॉ. दीपा बिरनाळे मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यावर प्रकाश टाकला. संविधानाने दिलेल्या मूल्यांचा सन्मान करणे, हाच खरा ‘स्वाभिमान’ आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी बी.एड. प्रशिक्षणार्थी रितेश सलगर याने उपस्थितांचे आणि कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानले. हा कार्यक्रम महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांना संविधानाच्या मूल्यांशी जोडणारा आणि राष्ट्रीय बांधिलकीची जाणीव करून देणारा ठरला.
महाविद्यालयाला संस्थेचे चेअरमन मा. श्री. समीर बिरनाळे सर आणि संस्थेचे डायरेक्टर मा. श्री. सागर बिरनाळे सर यांचे अमूल्य मार्गदर्शन व पाठिंबा नेहमीच लाभत असतो. त्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
